- आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा
नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
सोशल मीडियावर रिल्स बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेलरोड परिसरातील कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची धिंड काढण्यात आली. यावेळी आरोपींनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा दिल्या.
उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रिल्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. नाशिक कि गुन्हेगारी जानलेवा है रे, सरळ घरात घुसून सामान अडकवतो रे अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सोहेल पठाण, गौरव भामरे, आदित्य अहिरे, किशोर चव्हाण, विनोद घुगे ( राहणार कॅनल रोड, आम्रपाली नगर झोपडपट्टी ) यांनी सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्वांना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट ,उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी कारवाई करून त्यांना अटक केली . त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या सर्वांचे मुक्तिधाम व जेलरोड कॅनॉल रोड या परिसरात धिंड काढण्यात आली. यावेळी आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्यात येत होत्या. उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV