परभणीत 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.) :स्वराज मित्र मंडळ आयोजित आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर अडचणीत असलेल्या माता भगीनीना 2551 साडी व 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आ.
आ.राहुल पाटील


परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.) :स्वराज मित्र मंडळ आयोजित आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर अडचणीत असलेल्या माता भगीनीना 2551 साडी व 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आ. डॉ. पाटील यांचा आयोजक विशालराजे तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना आ.डॉ. पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वराज मित्रमंडळाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून माता भगीनींना दिवाळी निमीत्त दिलेली ही छोटीशी भेट आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक नावंदर, बाळासाहेब मोहीते पाटील, अंबिका डहाळे, अरविंद काका देशमुख, मेहराजभाई सिददीकी, विठ्ठल तळेकर, नितीन देशमुख, रामराव डोंगरे, बाळासाहेब तरवटे, राजवीर पाटील, देवेंद्र देशमुख, बंडुनाना बीडकर, बाळराजे तळेकर (युवासेना शहरप्रमुख) आदि उपस्थित होते. कार्यक्रम किशन तळेकर व रामजी तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सुत्रसंचलन नवनाथ जाधव यांनी तर आभार प्रमोद जोगदंड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज मित्रमंडळाचे अध्यक्ष विशालराजे तळेकर, विकी जोगदंड, गोविंद तळेकर आकाश दुधाटे, पवन कुरिल, नारायण देशमुख, सोनू पवार शुभम जाधव, दौलत शिंदे, कैलास ईक्कर, सुधाकर सोळंके, दत्तराव काकडे, सुशांत तळेकर, रोहित घनघाव, पवन शिंदे, मुंजा पोळ, प्रदुम्न गिरी, गोविंद कदम, पप्पू रणवीर, शुभम बोबडे, लक्ष्मण बालटकर, कुशाल जोगदंड आदिनी प्रयत्न केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande