अमरावतीत कर्मयोगी गाडगेबाबा या महानाट्याचे आयोजन
अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी दि. १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी साय ६:३० वा. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी गाडगेबाबा या नाट्य चे आयोजन केले आहे. या या कार्य
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी गाडगेबाबा या महानाट्याचे आयोजन


अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी दि. १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी साय ६:३० वा. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी गाडगेबाबा या नाट्य चे आयोजन केले आहे. या या कार्यक्रमात एकूण ५० कलावंत असून आपल्या राज्यातील महनीय व्यक्तींची माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी ,तसेच आपला समृद्ध असा वारसा जपण्यासाठी श्री आशिष शेलार सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच विभागाचे संचालक श्री विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचा इतिहास आपल्याला माहिती होणार असून याचा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री विभीषण चवरे ,संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande