उत्तमराव ढिकले स्पोर्टस् फाऊंडेशन आयोजीत नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। : स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील कर्तबगार महिलांना नवदुर्गा आणि कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिकच्या मधील आणि नऊ म
उत्तमराव ढिकले स्पोर्टस् फाऊंडेशन आयोजीत नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.


नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

: स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील कर्तबगार महिलांना नवदुर्गा आणि कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिकच्या मधील आणि नऊ महिलांना नवदुर्गा पुरस्कार आणि ८० महिलांना कर्तबगार महिला पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या नवदुर्गामध्ये वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग, प्रशासकीय सेवा या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. चेतनाताई सेवक,सौ. गायत्री जाधव, सौ. जयमाला वसावे, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, कु. शिवानी टिळे, सौ. माधुरी निफाडे, सौ. कविता कुलकर्णी, सौ. पल्लवी कुलकर्णी, सौ. जयश्री गावित यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार ढिकले यांनी महिलांच्या कार्याला सलाम आहे असे सांगितले. या महिला आपल्या घराबरोबरच मुलांची शैक्षणिक जबाबदारी, सासरच्यांची मर्जी सांभाळत स्वतःच्या व्यवसायाला चालना देणे, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखणे, या सर्व गोष्टी सांभाळून या तारेवरच्या कसरतीमध्ये अश्या कठीण परिश्रमातून समाजात आपली ओळख निर्माण करणे ही एक कला आहे असे सांगितले. असे मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करणे आमचे कर्तव्यच आहे असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande