वाचन माणसाला बहुश्रुत बनवते, वाचक प्रेरणा दिनात मत
लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव लासूणे शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हूरदळे,भाजपा लातूर जिल्हा महामंञी अमोल निडवदे, प्रसाद नाईकवाडे मुख्या
अ


लातूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव लासूणे शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हूरदळे,भाजपा लातूर जिल्हा महामंञी अमोल निडवदे, प्रसाद नाईकवाडे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले ,किरण नेमट प्रमुख वक्त्या रूपाली थोरात उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा सरचिटणीस अमोल निडवदे म्हणाले की याच विद्यालयात माझे शिक्षण झालेले असून येथे मिळालेल्या संस्कारामुळे मला सार्वजनिक जीवनात उपयोग होत असल्याचे सांगितले.तर वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात बहुश्रुतपणा येतो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे, असा सल्ला दिला.

प्रमुख वक्त्या रूपाली थोरात यांनी आपल्या वक्तव्यातून प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकांचे देवघर असावे पुस्तकातून आनंद मिळतो पुस्तकाचे वाचन वाढवावे . वाचनातून सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढतो. असे विचार मांडले.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून वाचक विद्यार्थी सुरभी नाईक व शिवशंकर बिरादार वाचक शिक्षक मनीषा आचारे यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी डॉ अब्दुल कलाम यांचे असे घडवा आपले भविष्य हे पुस्तक विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे व ज्ञानवंत होण्यासाठी प्रगल्भ वाचन हवे. समाजात वाचनामुळे एक वेगळी ओळख निर्माण होते असे विचार मांडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande