मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। टाटाच्या अधिपत्याखालील व्होल्टास लिमिटेड आणि त्यांचा संयुक्त उद्यम ब्रँड व्होल्टास बेकोने त्यांच्या बहुप्रतिक्षित 'दिवाळी ऑफर्स'ची घोषणा केली आहे. ज्यासह ग्राहकांना अभूतपूर्व किमतींमधील नाविन्यपूर्ण, ऊर्जा-कार्यक्षम व स्टायलिश होम अप्लायन्सेसह त्यांच्या घरांना सुशोभित करण्याची संधी आहे. सहयोगाने त्यांचा या सणासुदीच्या काळाला अधिक उत्साही, अधिक आरामदायी करण्याचा आणि संपूर्ण भारतातील कुटुंबांना सर्वोत्तम मूल्य देण्याचा मनसुबा आहे. साजरी करणाचा भाग म्हणून व्होल्टास ऊर्जा-कार्यक्षम एअर कंडिशनर्स, एअर कूलर्स आणि होम अप्लायन्सेसच्या व्यापक श्रेणीवर आकर्षक डिल्स देत आहे. या ऑफर्स सणासुदीच्या काळादरम्यान भारतातील अधिकाधिक कुटुंबांना प्रीमियम कूलिंग सोल्यूशन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.
उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत व्होल्टास ग्राहकांना त्यांच्या उत्पादन श्रेणीमध्ये विविध ऑफर्स देत आहे, जसे परिवर्तनशील सोपे ईएमआय पर्याय, प्रतिमहिना १,०८८ रूपयांपासून सुरू होणारे फिक्स्ड ईएमआय, झीरो डाऊन पेमेंट, पात्र उत्पादनांवर कोणतेही व्याज नाही व कोणतेही डिलर पेआऊट नाही आणि निवडक बँक कार्ड्सवर जवळपास ६००० रूपये कॅशबॅक. ग्राहक निवडक एअर कंडिशनर्सवर ७९९ रूपये + जीएसटीसह सवलतीच्या दरात इन्स्टॉलेशन आणि वॉटर हीटर्सवर मोफत इन्स्टॉलेशन, तसेच निवडक प्रीमियम मॉडेल्सवर आघाडीच्या एनबीएफसींच्या माध्यमातून जवळपास १८ महिन्यांपर्यंत दीर्घकालीन ईएमआय प्लॅन्सचा देखील आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे असे अप्लायन्सेस अधिक प्रमाणात उपलब्ध होतील, कुटुंबांना सहजपणे व सोईस्करपणे त्यांच्या घरांना अपग्रेड करण्यास मदत होईल.
या ऑफर्सबाबत मत व्यक्त करत व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंदन मेनन म्हणाले,‘‘सणासुदीत ग्राहकांना घर अपग्रेडसाठी उत्तम डिल्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव देत आहोत. आमची उपकरणे जीवन अधिक सोपे आणि आनंददायी बनवतात.’’ त्यांनी पुढे सांगितले, ‘‘ऊर्जा-कार्यक्षम आणि स्मार्ट कूलिंग सोल्यूशन्सद्वारे आम्ही एकजूटीचा उत्साह साजरा करत आहोत आणि ग्राहकांना आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्याचे आवाहन करतो.’’
यंदा दिवाळीला व्होल्टास बेको आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये उत्सवी डिल्ससह साजरीकरणाला अधिक उत्साहित आणि स्मार्ट करत आहे. हायजिन+™ तंत्रज्ञान असलेल्या वॉशिंग मशिन्स २०,९९० रूपयांपासून, हार्वेस्टफ्रेश™ फ्रेशनेस असलेले रेफ्रिजरेटर्स २१,५५३ रूपयांपासून, त्वरित २-मिनिट उत्सवी कूकिंगसाठी मायक्रोवेव्ह्ज फक्त ४९९० रूपयांपासून आणि पार्टीनंतर साफसफाई सहजपणे करण्यासाठी डिशवॉशर्स १९,९९० रूपयांपासून खरेदी करण्याचा आनंद घ्या.
या उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करण्यासाठी व्होल्टास बेकोने मोहिम 'लाइट ए फेस्टिव्ह स्पार्क विथ व्होल्टास बेको' देखील लाँच केली आहे. संपूर्ण भारतात टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्टोअरमधील क्रियाकलापांसह ३६०० मार्केटिंग आऊटरिचच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रसार करण्यात येईल. या उपक्रमाचा दिव्यांच्या सणादरम्यान कुटुंबांसोबत भावनिक नाते निर्माण करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे प्रत्येक अप्लायन्स खरेदी आनंदमय व सोईस्कर क्षणामध्ये बदलेल.
व्होल्टास आणि व्होल्टास बेको उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्याप्रती कटिबद्ध आहे, जी दैनंदिन राहणीमान उत्साहित करतात आणि यंदाचा सणासुदीचा काळ अपवाद नाही. ग्राहक त्यांच्या घरांसाठी परिपूर्ण कूलिंग सोल्यूशन्स शोधण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्होल्टास रिटेल आऊटलेटला भेट देऊ शकतात किंवा ऑनलाइन ऑफर्सचा शोध घेऊ शकतात.
वितरण पोहोच व बाजारपेठ उपस्थिती
व्होल्टासचे देशभरात ३०,००० टचपॉइण्ट्स, १७५० सर्विस फ्रँचायझी आणि ४५ सर्विस सेंटर्ससह सर्वात मोठे वितरण नेटवर्क आहे. कंपनीने लहान शहरांपर्यंत उपस्थिती वाढवली असून, व्होल्टास बेकोद्वारे रिटेल व ई-कॉमर्स बाजारात मजबूत स्थान निर्माण केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule