नांदेडमध्ये गुन्हेगारांचे फोटो-बॅनर लावणाऱ्यांवर होणार कारवाई
नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड शहरात गुन्हेगारांचे फोटो आणि नावे असलेले शुभेच्छा बॅनर लावण्याची प्रथा वाढू लागल्याने पोलीस प्रशासनाने यावर कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे
नांदेडमध्ये गुन्हेगारांचे फोटो-बॅनर लावणाऱ्यांवर होणार कारवाई


नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड शहरात गुन्हेगारांचे फोटो आणि नावे असलेले शुभेच्छा बॅनर लावण्याची प्रथा वाढू लागल्याने पोलीस प्रशासनाने यावर कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे बॅनर लावणाऱ्यांवर आता थेट एफआयआर दाखल करण्यात येईल.

शहरातील विविध भागात अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावले जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने मोहीम सुरू केली होती. त्यात आता पोलिसांनीही हस्तक्षेप करत अशा गुन्हेगारांचे “महिमामंडन” करणाऱ्या बॅनरवर आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधीक्षक कुमार यांनी सांगितले की, समाजात चुकीचा संदेश जाणाऱ्या या प्रथेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande