धुळे , 15 ऑक्टोबर (हिं.स.) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांचे पोलीस ठाण्यातील किंमती व इतर मुद्देमालाचे मुळ मालक आणि फिर्यादी यांना त्यांचा चोरीस गेलेला तसेच गहाळ झालेला मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन हस्तांतर करण्याकरिता निर्देश दिले होते. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वा. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे हस्ते दिवाळी सणाचे औचित्य साधुन मुद्देमाल वितरण सोहळा-२०२५ पार पडला. या कार्यक्रमात मुद्देमालाचे मुळ मालक आणि फिर्यादी यांना एकुण ८ लाख ६८ हजार रु. किंमतीचे एकुण ४१ मोबाईल परत करण्यात आले आहेत. यापुर्वी धुळे जिल्हयातील विविध पोलीस ठाणे यांनी एकुण १२ लाख ३२ हजार रु.किं.चे १०९ मोबाईल असे एकुण १५० मोबाईल मुद्देमालाचे मुळ मालक आणि फिर्यादी यांना परत करण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील हरविलेले व चोरी झालेले मोबाईल शोध मोहिम सुरु आहे. तांत्रिक विश्लेषण व कायदेशीर प्रक्रिया पार पाडुन मुद्देमालाचे मुळ मालक आणि फिर्यादी यांना देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. या कार्यक्रमास मोबाईल चोरीच्या फिर्यादी देणार्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त मनोगत व्यक्त करुन धुळे पोलीसांचे व न्याय व्यवस्थेचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर