मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे विशेष चौकशी अधिकारी-२, सचिव पंकज कुमार, उपसचिव हेमंत डांगे, अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांनीही डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर