पुण्यात ‘कोलिफार्म’ जीवाणूमुळे उलट्या, जुलाबाची साथ 
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यातील कोथरूड आणि बावधन परिसरातील उलट्या, जुलाबाची साथ दूषित पाण्यातील ‘कोलिफार्म’ जीवाणूमुळे पसरल्याचे समोर आले आहे. महापालिका आरोग्य विभागाने या परिसरातील पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही बाब निष्पन्न आली आहे. या भागात
पुण्यात ‘कोलिफार्म’ जीवाणूमुळे उलट्या, जुलाबाची साथ 


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुण्यातील कोथरूड आणि बावधन परिसरातील उलट्या, जुलाबाची साथ दूषित पाण्यातील ‘कोलिफार्म’ जीवाणूमुळे पसरल्याचे समोर आले आहे. महापालिका आरोग्य विभागाने या परिसरातील पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही बाब निष्पन्न आली आहे. या भागातील उलट्या, जुलाबाची रुग्णसंख्या ११६ वर पोहोचली असून, साथ आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. बावधन परिसरात दूषित पाण्यामुळे साथ आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. या भागात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, यांनी दिली . आरोग्य विभागाने १२ हजार ७५ घरांमधील ४४ हजार १४२ नागरिकांचे सर्वेक्षण केले. महापालिका रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात ७३ तर सर्वेक्षणामध्ये ४३ रुग्णांची नोंद झाली. या भागात ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ११६ रुग्णांची नोंद झाली आहे. या भागात सोमवारी एक रुग्ण आढळला होता तर मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे हा उद्रेक आटोक्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande