पहिल्या कसोटीत पाकिस्तानने केला द.आफ्रिकेचा ९३ धावांनी पराभव
इस्लामाबाद, 15 ऑक्टोबर (हिं.स.)लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ९३ धावांनी पराभव केला. या विजयासह, पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानी फिरकी गोलं
नोमान अली


इस्लामाबाद, 15 ऑक्टोबर (हिं.स.)लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ९३ धावांनी पराभव केला. या विजयासह, पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानी फिरकी गोलंदाज नोमान अलीने शानदार गोलंदाजी करत कसोटी सामन्यात एकूण १० विकेट्स घेतल्या. नोमान अलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्यांदा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य दिले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शाहीन आफ्रिदीनेही चार विकेट्स घेतल्या. ज्यामुळे आफ्रिकन फलंदाजांना शरणागती पत्करावी लागली. साजिद खाननेही दोन फंलदाजांना बाद केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नोमान अलीने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. लाहोरच्या खेळपट्टीवर, नोमान अलीने आपल्या फिरकीने आफ्रिकन फलंदाजांना त्रास दिला.

पाकिस्तानने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला फक्त २६९ धावाच करता आल्या. पाकिस्तानला पहिल्या डावात १०९ धावांची आघाडी होती. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात १६७ धावा करत दक्षिण आफ्रिकेला २७७ धावांचे लक्ष्य दिले.

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघ आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, पाकिस्तान देखील हा सामना जिंकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान १०० पीसीटी गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम आहे. तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande