अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
अतिवृष्टी मुळे नाल्यात पडून जुना कॉटन मार्केट इथे वाहून गेलेले सोनू कन्नू करोशिया यांच्या परिवाराला सरकारच्या वतीने आमदार रणधीर सावरकर पाठपुरावामुळे धनादेश तहसीलदार यांनी प्रदान केले.
देशमुख फाईल मधील देशमुख फाईल मधील सोनू करो सिया रिगल आणि वसंत टॉकीज इथे साफसफाई कामगार म्हणून कार्यरत होते 27 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे पडून अकोला पासून 94 किलोमीटरवर अनेक शोध पथक केल्यानंतर त्यांचा मृतदेह मिळाला होता. यासंदर्भात प्रशासनाची सतत संपर्कात राहू आमदार सावरकर यांनी या भागातील सामाजिक कार्यकर्ते पवन महल्ले प्रकाश धोगलीया यांच्या माध्यमातून सतत त्यांच्या परिवाराशी संपर्कात होते आणि घटना झाल्यानंतर ताबडतोब भेट दिली होती त्यांच्या परिवाराला संतांना करून शासनाकडे परिवाराला मदत करण्याची पत्र दिले होते त्या पत्रानुसार चार लाख रुपये सरकारने अनुग्रह राशी दिली आहे.
यावेळी पवन महाले आरती ,धोगलिया, प्रकाश ,धोगली या, राजेंद्र गिरी, रमेश करिअर नितीन राऊत, डॉक्टर युवराज देशमुख राम ठाकूर आदी प्रामुख्याने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे