अविष्कार सल्लागार समितीची बैठक; विद्यार्थ्यांच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय
जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘अविष्कार सल्लागार समिती’ची बैठक कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या
अविष्कार सल्लागार समितीची बैठक; विद्यार्थ्यांच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय


जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘अविष्कार सल्लागार समिती’ची बैठक कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यपसदस्य जे. व्ही. साळी, अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस. टी. भुकन, समन्वयक डॉ. नवीन दंदी, तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते. बैठकीत ‘अविष्कार संशोधन स्पर्धा’च्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विद्यापीठ प्रशालेसाठी स्पर्धा ४ डिसेंबर रोजी विद्यापीठात होणार असून, जिल्हास्तरीय स्पर्धा ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. जळगाव जिल्हा — पी. आर. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव धुळे जिल्हा — झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे नंदुरबार जिल्हा — विद्यापीठ संचलित कला विज्ञान महाविद्यालय, मोलगी व आदिवासी अकादमी, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रत्येक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय फेरी संपल्यानंतर विद्यापीठस्तरीय अंतिम स्पर्धा २३ व २४ डिसेंबर रोजी विद्यापीठ परिसरात पार पडणार आहे.बैठकीस वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रा. रोकडे, प्रा. हरीभाऊ तिडके, प्रा. योगेश पाटील, प्रा. अमरदीप पाटील, प्रा. अजयगिरी गोस्वामी, प्रा. म. सु. पगारे व प्रा. रमेश सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande