नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
रुग्ण कल्याण समिती सदस्य या नात्याने भारतीय जनता पक्षाचा जिल्हा चिटणीस पुनम पवार यांनी रुग्णांना या सुविधा देण्यात कसलीही कुचराई न करण्याबाबत डॉक्टर्स व स्टाफला सूचना दिल्या.
नायगाव रुग्णालय समिती बैठक संपन्न झाली आरोग्यसेवांचा आढावा त्यांनी घेतला
नायगाव ग्रामीण रुग्णालय, रुग्णकल्याण समातीची बैठक प्रमुख उपस्थितीत पार पडली.
रुग्णालय समितीचे अध्यक्ष तथा सदस्य यांच्यात समन्वय साधून रुग्णांना अत्यावश्यक सर्व सोयी सुविधा, उपचार हे निकषाने पुरविण्याबाबत अधिक्षक व ग्रामीण रुग्णालय प्रशासन यांना सूचना केल्या.
तसेच दवाखान्यातील सर्व आरोग्य सेवांबाबत आढावा घेण्यात आला.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून गत 10 वर्षांपासून गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी रुग्णालयात णाविविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या सर्व सोयीसुविधांचा विनाअडथळा सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना लाभ मिळावा, यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे नेहमीच प्रयत्नशील आहेत. असे सांगितले.
यावेळी नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर्स, स्टाफ तसेच भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis