नांदेड : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपा नेत्यांनी घेतली वकिलांची भेट
नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज नांदेड येथील वकिलांची भेट घेतली. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे वकिलांच
अ


नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज नांदेड येथील वकिलांची भेट घेतली.

पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालय येथे वकिलांची भेट घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.

पदवीधर मतदार निवडणूक या निमित्ताने आज नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिलांची भेट घेऊन सर्व विधीज्ञाना जास्तीत जास्त प्रमाणात पदवीधर मतदार होण्याचे आवाहन केले व तसेच जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी ही आपेक्षा व्यक्त केली.

या त्याप्रसंगी वकील संघ अध्यक्ष ॲड आशिष गोधमगावकर,विधीआघाडी अध्यक्ष ॲड.संभाजीराव देशमुख ,ॲड.अभिलाष नाईक,ॲड.रावसाहेब देशमुख,ॲड. सरदार अमरिक वासरीकर,ॲड. प्रसाद रानवळकर,ॲड. कनंकदाडे , महानगर सर चिटणीस विजय येवनकर, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, सोशल मीडिया प्रदेश सदस्य राज यादव यांच्यासह जिल्ह्य़ातील वकील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande