इ.मा. प्रवर्गातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दुर्बल व उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने स्थापन केलेल्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत विविध लाभदायक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाचे धोरण स्वयंरोज
इ.मा. प्रवर्गातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दुर्बल व उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी

शासनाने स्थापन केलेल्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत विविध

लाभदायक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाचे धोरण स्वयंरोजगाराच्या माध्यमातून

पात्र लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाकडून जळगाव

जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत सध्या खालील सात योजना प्रभावीपणे

राबविण्यात येत आहेत-२० टक्के बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना (रु. १ लाखांपर्यंत),

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु. १५ लाखांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा

योजना (रु. १५ लाख ते ५० लाखांपर्यंत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १५ लाख

ते २० लाखांपर्यंत),महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, कौशल्य विकास योजना.

या सर्व योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय

भवन, मायादेवी मंदिर, महाबळ कॉलनी, जळगाव या जिल्हा कार्यालयाशी थेट संपर्क साधावा,

असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय गोविंद तायडे यांनी नागरिकांना

केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande