- पक्षप्रमुख मनोहर धोंडेंची उपस्थिती
नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख तसेच ओबीसी आरक्षणाचे प्रणेते प्रा. मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली, सेवा जनशक्ती पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची संघटित बैठक सेवा जनशक्ती पार्टी संपर्क कार्यालय, लोहा येथे संपन्न झाली.
या बैठकीत आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणनितीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क मोहीम, आणि समाजहिताच्या विविध विषयांवर विचारमंथन झाले.
बैठकीस सेवा जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis