बीड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवावा -अक्षय मुंदडा
बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।आगामी बीड नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षय मुंदडा यांनी उपस्
अ


बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।आगामी बीड नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षय मुंदडा यांनी उपस्थित राहून संबोधित केले.

बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांना आपल्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर करून अर्ज देण्याचे निर्देश दिले. तसेच , आगामी बीड नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय सुनिश्चित करून नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीस पक्ष निरीक्षक अरुण राऊत, रमेशभाऊ कराड, सौ. रूपालीताई कचरे तसेच शहराध्यक्ष अशोकराव लोढा यांच्यासह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande