जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तृणधान्य सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामात
हरभरा व ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत 10 वर्षांआतील हरभरा बियाण्यांसाठी प्रतिकिलो रु. 50 किंवा किमतीच्या 50 टक्के,
जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. 10 वर्षांवरील हरभरा बियाण्यांसाठी
प्रतिकिलो रु. 25 किंवा किमतीच्या 50 टक्के, तसेच 10 वर्षांवरील ज्वारी बियाण्यांसाठी
प्रतिकिलो रु. 15 किंवा किमतीच्या 50 टक्के, जे कमी असेल ते अनुदान देय राहील याप्रमाणे
बियाणे वितरण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रमाणित बियाणे महाबीज, कृभको व राष्ट्रीय बिज निगम यांच्या अधिकृत वितरकांकडे
उपलब्ध आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापुरताच अनुदानाचा लाभ
मिळणार आहे. यापेक्षा अधिक क्षेत्रास अनुदान देय राहणार नाही.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ घ्यावा व अधिक
माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक यांनी केले
आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर