बुलडाणा, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कप सिरपसह इतर औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विक्री करू नयेत, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
अलीकडच्या काळात काही औषध विक्रेते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेअंतर्गत 21 औषध विक्रेत्यांची तपासणी केली. त्यात 16 औषध विक्रेत्यावर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कप सिरप विक्री केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. तसेच औषध विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर