जळगावात शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन
जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.)शेतकऱ्यांचे पाचोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जारगांव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना न
जळगावात शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन


जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.)शेतकऱ्यांचे पाचोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिवाळी पुर्व अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जारगांव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले. पाचोरा तालुक्यात मागील काही दिवसांत अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान काही प्रमाणात जाहीर केले आहे. जे अनुदान जाहीर केले ते दिवाळी च्या आधी त्यांच्या खात्यात जमा करा जेणेकरून त्यांची दिवाळी गोड जाईल. अशा मागण्यासह काँग्रेस, शिवसेनासह (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे जारगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँगेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड अविनाश भालेराव, शिवसेना उबाठा चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी सभापती उध्दव मराठे, रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस नितीन तावडे, अझर खान या सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कपाशी साठी सीसीआय सुरू करा, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना ना. गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले एक लाख त्वरीत द्या,सोयाबीन व ज्वारी ची शासकीय खरेदी त्वरीत सुरू करा, शेतकरी अनुदान घोटाळाची चौकशी त्वरीत करुन ज्यांच्या अनुदान काढले गेले त्यांना त्वरीत पैसे द्या, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, खरडुन गेलेल्या जमीनीचे हेक्टरी पाच लाख त्वरीत रोखस्वरुपात द्या, विहीरीत गाळ काढण्यासाठी त्वरीत दोन लाख द्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी एक लाख द्या, शहरातील पंचनामे केलेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande