गौण खनिजचे उद्दिष्ट 60 कोटींनी वाढले
सोलापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर गौण खनिज विभागाला यंदाच्या वर्षी 190 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 60 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. लाडक्या बहिणींचा भार आता सर्वच खात्यावर पडत असल्याचे यावरून दिसते.सोलापुरात
गौण खनिजचे उद्दिष्ट 60 कोटींनी वाढले


सोलापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर गौण खनिज विभागाला यंदाच्या वर्षी 190 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 60 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. लाडक्या बहिणींचा भार आता सर्वच खात्यावर पडत असल्याचे यावरून दिसते.सोलापुरात वाळू, मुरूम उपसा, दगडखाणी यांच्या रॉयल्टीतून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. यामध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात वाढ होत असते. गेल्यावर्षी गौण खनिज विभागाला 130 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु त्यापैकी 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. वाळू डेपो असल्याने वाळूतून म्हणावा तसा महसूल मिळाला नाही, तरीदेखील गौण खनिज विभागाने 100 कोटी रुपयांपर्यंतचे टार्गेट पूर्ण केले. 2025-26 मध्ये उद्दिष्टात दहा टक्के वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र तब्बल 60 कोटी रुपये वाढवून 190 कोटी रुपये करण्यात आले. एकीकडे उत्पन्न घटत असताना उद्दिष्ट वाढवून देण्याचा शासनाचा निर्णय अचंबित करणारा आहे. लाडक्या बहिणींचा हा परिणाम असल्याचे दिसून येते. मार्च 2026 पर्यंत गौण खनिज विभागाला 190 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande