सोलापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : संततदार पाऊस व अतिवृष्टीमुळे सोलापुरातील बागायत क्षेत्राबरोबर फळ-बागायतदार शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असतानाच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्याने 15 हजार 200 रुपये भरले असताना विम्याचा हप्ता मात्र 5994 रुपये इतका मंजूर करत विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचे चित्र आहे.
गतवर्षी द्राक्ष पिकाला लवकर पावसाने हजेरी लावल्यामुळे शिवाय व्यापाऱ्यांनी देखील द्राक्ष खरेदी करणे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शंभर एकराहून अधिक शेतकऱ्यांचे द्राक्षे ही झाडाला तशीच राहिली त्यामुळे शेतकऱ्यांना ती द्राक्षे बांधावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर केलेला खर्च वाया जाऊन एक रुपया देखील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले नाही तो तोटा सहन करून गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या 2 एकर द्राक्ष पिकाचा विमा 15 हजार 200 रुपये इतका विमा बजाज आलियाज जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड