सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विकसित गाव अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे उभारण्यात आलेल्या बायोगॅस संयंत्रासह वृक्षारोपण व सोलर प्रकल्पांची पाहणी केली.मानेगाव हे सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागातील गाव असून, येथे नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. पाहणी दरम्यान अतुल कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष बायोगॅस संयंत्राची कार्यपद्धती जाणून घेतली. संयंत्राविषयीची माहिती बारामती इको सिस्टीम्स अँड टेक्नोलॉजी प्रा. लि. चे संचालक अभिमन्यू नागवडे यांनी दिली.
या वेळी बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले, “विषमुक्त शेती करायची असेल आणि इंधन खर्चात बचत करायची असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने बायोगॅस यंत्र बसवणे आवश्यक आहे. मानेगावसारख्या गावांत ‘जलतारा प्रकल्प’ उभा राहिल्यानंतर पाण्याची समस्या कायमची दूर होईल
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड