* सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीच्या नुकसानाची मिळणार भरीव मदत
अमरावती, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
जुलै, ऑगस्ट महिन्यात चांदुर उपविभागातील तीन तालुक्यात सततधार पाऊस, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या ५८ हजार ४१६ शेतकऱ्या पैकी ३५ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ३७ कोटी १५ लक्ष पैकी २२ कोटी ५८ लक्ष रुपये जमा झाले असल्याची माहिती चांदुर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी दिली
धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यात जुलै ऑगस्टमध्ये सतत पाऊस व अतिवृष्टी झाली यामध्ये चांदुर रेल्वे तालुक्यातील १९ हजार ५१० शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले १३ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर झाले १ ३ हजार ५३ शेतकऱ्यांच्या खात्यात ८ कोटी १३ लक्ष जमा झाले धामणगाव रेल्वे तालुक्यातील २१ हजार १९४ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासाठी १२ कोटी ३९ लक्ष मंजूर झाले ९ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ कोटी ५० लक्ष जमा करण्यात आले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १७ हजार ७१२ शेतकऱ्यासाठी ११ कोटी ३२ लक्ष मंजूर झाले होते १२ हजार ७०५ शेतकऱ्यांच्या खात्यात ८ कोटी २१ लक्ष रुपये जमा झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात इतर रक्कम जमा व्हायची आहे
सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची मिळणार भरीव मदत
चांदुर रेल्वे उपविभागात सर्वाधिक नुकसान सप्टेंबर महिन्यात झाले शासनाच्या नव्या आदेश तीन हेक्टर क्षेत्राप्रमाणे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे तसेच जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे नुकसानाचे अतिरिक्त फरकाची मदतीही शेतकऱ्यांना मिळणार असून त्या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला असल्याचे कोरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी