बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५७७ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. या बद्दल पालकमंत्री अजित दादा पवार यांचे आ. विजयसिंह पंडित यांनी आभार मानले आहेत
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम दिवाळी पुर्वी किंवा दरम्यान जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मर आय डी काढले नसतील त्यांनी तत्काळ ई - केवायसी करुन घेणे गरजेचे आहे. फॉर्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन दिवसांत ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे पालकमंत्रीअजितदादा पवार यांनी सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मर आय डी काढले नसतील त्यांनी तत्काळ ई के वाय सी करुन घ्यावी असे आवाहन आ विजयसिंह पंडित यांनी केले आहे.माहे सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यांनी आपदग्रस्त शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन धीर दिला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५७७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिलीआहे
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis