बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – जळगाव पालकमंत्री
जळगाव, 17 ऑक्टोबर (हिं.स.) बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यास
बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – जळगाव पालकमंत्री


जळगाव, 17 ऑक्टोबर (हिं.स.) बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

नशिराबाद येथे महिलांसाठी ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र तयार होणार आहे. महिलांना आपल्या उत्पादनांची विक्री स्थानिक बाजारपेठेत करण्याची संधी मिळणे म्हणजे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी नशिराबाद व परिसरातील महिला बचत गटांच्या लघुउद्योजिकांसाठी उभारण्यात आलेल्या महिला बचत गट मॉलचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या मॉलमध्ये महिलांनी साडी, लेडीज गारमेंट्स, बांगड्या, ब्युटी पार्लर साहित्य, जनरल स्टोअर, फरसाण, स्वीट्स, चाट सेंटर, भाजीपाला विक्री आदी १३ विविध व्यवसायांची दुकाने सुरू केली आहेत. काही दुकाने स्वतःच्या मालकीची असून काही महिलांनी ती भाड्याने घेतली आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा मॉल हा केवळ व्यवसाय नव्हे, तर महिलांच्या स्वप्नांचा उत्सव ठरला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर यांनी केले, प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, तर स्वाती सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande