बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सारिका योगेश क्षीरसागर यांनी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना सारिका क्षीरसागर म्हणाल्या की,आम्हाला भर भक्कम साथ देणाऱ्या आमच्या सहकाऱ्याची ही निवडणूक आहे.यासाठी आम्ही अजित दादांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून नवीन चेहऱ्यांना यामध्ये संधी देणार आहोत.भविष्यात बीड कसे असेल आणि आपल्या ताब्यात सत्ता आल्यावर त्यात काय बदल होतील हे घेऊन आम्ही प्रत्येक घरात पोहचणार आहोत.विकास हीच जात,आणि विकास हाच धर्म ही आमची मुख्य संकल्पना असून,यासाठी आम्ही जोमाने तयारी करणार आहोत.या बैठकीस मोठ्या संख्येने सर्व आजी,माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis