बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी अधिकृत बैठक होणार
बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) बीड जिल्ह्याच्या वतीने आगामी बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक 19 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी स
अ


बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) बीड जिल्ह्याच्या वतीने आगामी बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक 19 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, छत्रपती कॅपीटल, मित्रनगर चौक, बीड येथे घेण्यात येणार आहे.

या बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांशी प्राथमिक चर्चा व निवडणुकीचे नियोजन करण्या हेतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बीड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केले आहे.

या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांनी कळवले की, पक्षाचे संघटन अधिक बळकट करणे, योग्य उमेदवारांची निवड आणि आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणे, या प्रमुख उद्दिष्टांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून पक्ष संघटनाच्या बळकटीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande