छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील लामखाना गावातील अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती खा. डॉ. कल्याण काळे यांनी आज दिली आहे.
लामकाना गावच्या सरपंच सौ. पंचशीलाबाई गौतम घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य प्रयागबाई सांडू घोरपडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष (अनु.जाती विभाग) गौतम सांडू घोरपडे, भाऊसाहेब बारबैले, गोरख हरिभाऊ बारबैले, तसेच लिंगदरी गावचे संदीप सांडू गवळे, आनंद गवळे यांनी भाजप सोडून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांनी विलास बापू औताडे (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस सेवादल) आणि किरणभाऊ पाटील डोणगावकर (जिल्हाध्यक्ष) यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या वेळी तालुका अध्यक्ष मनोजभाऊ शेजुळ, लामकाना गावचे माजी सरपंच भानुदास पाटील बारबैले, जिजाबाई भानुदास बारबैले, आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis