लातूर, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून लातूर मनपाच्या गौतम नगर येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रासाठी आवश्यक उपकरणे देण्यात आली.पालिका आयुक्त मानसी यांच्या उपस्थितीत या उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले.
बँकेच्या पुढाकारातून दंत शल्य चिकित्सा आद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे आरोग्य केंद्राला देण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त पंजाबराव खानसोळे, बँकेचे क्षेत्रीय प्रमुख एकनाथ जाधव,शाखा प्रबंधक अजिंक्य पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारती, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांच्यासह आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
या केंद्रातील दंत शल्य चिकित्सा अद्ययावत झाल्याने गरजू नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मानसी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis