हिंगोली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा
परीक्षा-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. 1 ते 5 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
दि. 29 सप्टेंबर, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेतील जाहिरातीस अनुसरून निश्चित अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए, बीकॉम, बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट, 2025 नुसार दि. 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis