छ. संभाजीनगर : आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।पैठण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना शासनाच्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आ
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।पैठण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना शासनाच्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. तहसीलदार ज्योती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले.

यामध्ये श्रीमती कल्पना सूर्यकांत छडीदार, श्रीमती सिता भाऊसाहेब धनावडे, श्रीमती रुख्मीनी ज्ञानदेव औटे, श्रीमती वनिता संजय कोहकडे, श्रीमती राधा सोनू गोर्ड, श्रीमती संगिता गणेश शिंदे यांचा समावेश आहे.

याप्रसंगी नायब तहसीलदार राहूल बनसोडे, नायब तहसीलदार प्रभाकर घुगे, नारायण बंगले महसूल सहाय्यक, स्विय सहाय्यक सतीश आंधळे, अप्पासाहेब निर्मळ. महानंदा दुध डेअरी चे संचालक नंदू पाटील काळे, नामदेव खरात, दत्ता निवारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande