नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेडमध्ये फटाका व्यापाऱ्यांची अनोखी दिवाळी–अनाथ मुलांसोबत साजरी करण्यात आली. नांदेड हिंगोली गेट येथील फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने यंदाची दिवाळी काहीशी खास ठरली.
सामाजिक बांधिलकी जपत फटाका असोसिएशनने अनाथ मुला-मुलींसोबत दिवाळी साजरी करत त्या मुला-मुलींना फटाके, नवीन कपडे व मिठाई वाटप विधानपरिषद गटनेते हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर उपस्थित होते. तसेच उपस्थित सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मंत्री,धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यासह मान्यवर होते.
-------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis