कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार- गडकरी
नागपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : कामठी-कोराडी-कन्हान यासह नागपूर भोवताली असलेल्या गावांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासन, रेल्वे, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, महानगर विकास प्राधिकरण व महानगर पालिक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विकास कामांवर बैठकीला संबोधित करताना


नागपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : कामठी-कोराडी-कन्हान यासह नागपूर भोवताली असलेल्या गावांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासन, रेल्वे, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, महानगर विकास प्राधिकरण व महानगर पालिका या सर्व यंत्रणांचा योग्य समन्वय महत्वाचा आहे. नागपूरच्या ग्रामीण विकासाला विविध योजनांच्या माध्यमातून नवा आयाम देऊ. यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

विविध विकास कामांबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेण्यात आली. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीस मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मिणा, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कामठी-कळमना मार्गावरील निलम लॉन या जागी विविध व्यवसायिकांसाठी सर्व सुविधायुक्त दहा मजली मॉल उभारण्यात येणार आहे. मेट्रोने संबंधित एजंसीसमवेत याबाबत करार केला आहे. येत्या तीन महिन्यात निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.

मनपा नाका कोराडी रोड ओव्हर ब्रिज ते बोखारा मार्गावरील रेल्वे क्रासिंग पर्यंत उड्डाणपूल तयार करणे, आशा हॉस्पीटल, कामठी-कन्हान मेट्रो ट्रॅक खालील भागाचे सौदर्यीकरण करणे यावर बैठकीत आढावा घेण्यात आला. कोराडी महादेव मंदिर टेकडी ते महाजेनको संतुलन तलावापर्यंत रोप वे तयार करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. उपलवाडी अंडरपास बाहय वळण रस्ता या कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत अहवाल सादर केला जाणार असून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

आशा हॉस्पीटल, कामठी-कन्हान मेट्रो ट्रक खालील भागाच्या सौदर्यीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मेट्रो यांनी मिळून करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. यात रस्ता अतिक्रमण काढण्याच्याही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कामठी-रामनगर फुटब्रीज येथील काम सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करणार आहेत. याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. कोराडी रोड येथील उड्डाणपूलाचे आरेखन तयार झाले असून याच्या निविदा लवकर काढण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. कोराडी-खिंडसी, कोराडी-ताडोबा, कोराडी-पारस येथील जलाशय सी-प्लेन सुविधेच्या दृष्टीने मेट्रो व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिळून यावर एक अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे सांगितले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande