‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ या नावास अधिकृत मान्यता देत राजपत्र अधिसूचना
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।औरंगाबाद शहरास ‘छत्रपती संभाजीनगर’ हे ऐतिहासिक नाव देऊनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराची प्रक्रिया अद्याप अपूर्ण होती. यासंदर्भात सातत्यानं शासनाशी संवाद साधत राहिलो, पत्रव्यवहार केला. आज आनंदाचा क्षण आहे; महा
Q


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।औरंगाबाद शहरास ‘छत्रपती संभाजीनगर’ हे ऐतिहासिक नाव देऊनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराची प्रक्रिया अद्याप अपूर्ण होती. यासंदर्भात सातत्यानं शासनाशी संवाद साधत राहिलो, पत्रव्यवहार केला.

आज आनंदाचा क्षण आहे; महाराष्ट्र शासनानं केंद्रीय अधिनियमानुसार ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ या नावास अधिकृत मान्यता देत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.

हा निर्णय छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी स्मृतींना केलेलं अभिवादन आहे. यापुढे स्थानकावर छत्रपती संभाजीराजेंचं नाव अभिमानानं लिहिलं जाईल, याचा आनंद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande