गेवराई: बाग पिंपळगाव च्या ग्रामस्थांचे उपोषण मागे
बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील आपल्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिटणीस अमरसिह पंडित यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषण सोडवले. बागपिंपळगांव हद्द
अ


बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील आपल्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिटणीस अमरसिह पंडित यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषण सोडवले.

बागपिंपळगांव हद्दीतील राष्ट्रीय महामार्गालगतची अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी तसेच गेवराई शहराजवळील बायपासला नायरा पेट्रोलपंपाच्या समोर होत असलेला उड्डाणपुल नवीन नागझरी पर्यंत वाढवून त्यालगत सर्विस रोड पुर्ण करणे बाबत बागपिंपळगाव येथील सरपंच रामेश्वर जगताप व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, गेवराई येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संगीता पाटील यांनी सदरील ठिकाणी नदी व कॅनॉल लगत सेवारस्ता व शेतकऱ्यांसाठी पुल बांधकामाचा सर्वे करून सर्वेचा अहवाल आल्यानंतर कामे सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार संदिप खोमणे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जयदीप औटी, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, सरपंच उमेश आर्दड, जयसिंग माने, अमित वैद्य, विष्णुपंत कोटंबे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande