नांदेड - शासकीय रुग्णालयातील उपकरणे, वेब पोर्टल सुरू होणार
नांदेड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। शासकीय रुग्णालयातील उपकरणे साधनसामग्रीच्या पारदर्शकतेसाठी आता वेब पोर्टल सुरू होणार असल्याची माहिती नांदेडचे भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील आरोग्याचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास
अ


नांदेड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)।

शासकीय रुग्णालयातील उपकरणे साधनसामग्रीच्या पारदर्शकतेसाठी आता वेब पोर्टल सुरू होणार असल्याची माहिती नांदेडचे भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्याचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय रुग्णालयामधील उपकरणांची बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात नासधूस होत असते किंबहुंना अनेक वेळा असे साहित्य चोरी जाते , अडगळीला पडते , नादुरुस्त होते त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत . ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपकरणांची नियमित आणि कार्यक्षम देखभाल करण्यासाठी केंद्रीय पोर्टल स्थापन करावे अशी मागणी केली होती.

या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असे वेब पोर्टल तयार करण्याचे अनुषंगाने सकारात्मक पावले उचलली आहेत.

या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय उपकरणांची नियमित आणि कार्यक्षम देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. तांत्रिक सहाय्य व साधनसामग्रीची मर्यादा लक्षात घेता उपकरणे वेळेवर दुरुस्त होणे कठीण जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. नादुरुस्त किंवा अडगळीत पडलेल्या तांत्रिक साधनसामग्रीचा थेट परिणाम रुग्ण सेवेवर होतो आहे . या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयामधील उपकरणांच्या देखभालीसाठी एक मजबूत आणि सुसंगत यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे . त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयातील उपकरणांची सविस्तर माहिती नोंदवण्यासाठी एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडे दिनांक 24 जुलै 2025 रोजी पत्र लिहिले होते. या पत्राची दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग लवकरच एक केंद्रीकृत वेब पोर्टल तयार करणार आहे.

यानुषंगाने अवर सचिव महाराष्ट्र शासन म. ग. जोगदंड यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande