नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ
काँग्रेस कमिटीच्या वतीने अनिल मिश्रा व राकेश किशोर यांच्या प्रतिमेस जोडे मारले. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेबद्दल वादग्रस्त विधान व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश न्या भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस कमिटीचे अनु. जाती जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यांत आले.
रेल्वे स्टेशन रोडवर राकेश किशोर व माथेफिरु वकील अनिल मिश्रा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करुन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांना निवेदन देण्यांत आले.
या वेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखाताई चव्हाण, मनपा स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला, काँग्रेस कमिटी अनु.जाती जिल्हाध्यक्ष तथा भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, माजी नगरसेवक रमेश गोडबोले, कॉम्रेड गंगाधर गायकवाड.ल लखन जोंधळे गुणवत कोलते मिनाक्षी भोसीकर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis