वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांबाबत योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी आशीर्वाद
सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रा कालावधीत वार
Collactor kumar


सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे. तसेच सर्व कामे 27 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande