सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरण्याऐवजी चिंतेची ठरली आहे. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात न मिळणारे दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. चांगले उत्पादन घेऊनही बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकऱ्यांना आपला कांदाही कवडीमोल दरात विकावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदाची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. देशांतर्गत बाजारात मालाचा पुरवठा वाढलेला नाही; उलट काही भागात तो कमीच आहे. तरीही निर्यातबंदीमुळे बाजारात खरेदी मंदावली असून, दर घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीचाही काही प्रमाणात परिणाम जाणवत आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड