लातूर, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। दीपावली निमित्त घराची स्वच्छता करताना नागरिकांनी घरातील अनावश्यक वस्तू मानपाने सुरू केलेल्या संकलन केंद्रात द्याव्यात,असे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वस्तू गरजवंतांना दिल्या जाणार आहेत.
नागरिक घराची स्वच्छता करतात तेव्हा अनेक अनावश्यक वस्तू निघतात.या वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी संकलन केंद्रात द्याव्यात, असे आवाहन करत पालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात संकलन केंद्र उभारण्यात आले होते. पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी जुने कपडे व उपयोगी पडू शकेल असे साहित्य केंद्रावर जमा केले. मोठ्या प्रमाणात कपडे, सतरंज्या, १५ इलेक्ट्रॉनिक वस्तू, चप्पल - बुटांचे जोड,लोखंडी वस्तू जमा झाल्या. मनपाच्या वतीने पहिल्यांदाच हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त श्रीमती मानसी यांनी लातूरकर जनतेचे आभार मानले. या सर्व केंद्रावर जमा झालेले साहित्य गरजू लोकांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोचवले जाणार असल्याचेही श्रीमती मानसी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis