लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी
लातूरकरांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सुपुर्द केली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष रविशंकर केंद्रे व मित्रपरिवाराने दिलेला 41 हजार रुपयांचा धनादेश, तिरुपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेला 1 लक्ष 51 रुपयांचा धनादेश, गुरुकृपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेला 51 हजार रुपयांचा धनादेश तसेच भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य विवेक बाजपेयी, श्रीराम कुलकर्णी, शिवसिंह सिसोदिया, संजय चेवले, ॲड अजय इळेगावकर व व्यावसायिक मित्र परिवाराच्या वतीने जमा करण्यात आलेले 21 धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis