नांदेड - आ. चिखलीकर यांनी केले वडजे कुटुंबियांचे सांत्वन
नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील मराठा चळवळीतील तरुण नेते, शाम पाटील वडजे यांचे वडील गणपतराव वडजे यांचे दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात सिडको, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी लोहा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रत
अ


नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील मराठा चळवळीतील तरुण नेते, शाम पाटील वडजे यांचे वडील गणपतराव वडजे यांचे दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात सिडको, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी लोहा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वडजे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी शोकाकूल वडजे पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर देत सहसंवेदना व्यक्त केल्या व या दुःखातून सावरण्याचे बळ या परिवारास मिळो, अशी प्रार्थना केली.

यावेळी माजी आ.मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, माजी सभापती आनंदराव पा.ढाकणीकर, छावा मराठा संघटनेचे नेते इंजि. तानाजीराव हुस्सेकर, माजी सभापती शंकरराव ढगे,पत्रकार संग्राम मोरे आदींसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande