अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात आ. चिखलीकर यांच्या आढावा बैठका
नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याचे माजी मुख्यमंत्री तसा नांदेड भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील मुदखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसापासून अशोक चव्हाण
अ


नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसा नांदेड भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील मुदखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतली.

गेल्या काही दिवसापासून अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये वाघ युद्ध सुरू आहे एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका व शहर स्तरावरील आढावा पार पडली.

बैठकीत संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे पुढील धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

माजी आमदार सुभावराव साबणे, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, माधव पावडे, स्वप्निल पाटील इंगळे, उत्तमराव सोनकांबळे, शिवाजी पा. लहकुदकर, सुरेश बिल्लेवाड, परशुराम पा. डौरकर, रोहन कांबळे, हनुमंत नरहरे, मोहमद साजीद, जयश्री कन्हाळे, ममताताई सोनकांबळे, पुजाताई व्यवहारे, गजानन बोडले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande