आमदार कर्डिले यांचे निधन ,बीड जिल्ह्यातील नागरिकांची श्रद्धांजली
बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अकाली निधनाने राहुरी मतदारसंघासह संपूर्णपणे एक लोकनेता गमावला आहे. अशा शब्दात बीड जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांच्य
अ


बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अकाली निधनाने राहुरी मतदारसंघासह संपूर्णपणे एक लोकनेता गमावला आहे. अशा शब्दात बीड जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे

राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहेअनेकदा आमदार, राज्यमंत्री, तसेच अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य सदैव स्मरणात राहील. जनतेशी असलेलं त्यांचं सखोल नातं आणि कार्यतत्परता ही त्यांची खरी ओळख होती.त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे बीड जिल्ह्यातील विविध संघटना आणि पक्ष नेत्यांनी म्हटले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande