नागपूरकरांना मिळणार वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी
नागपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) यावर्षी नागपुरात 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान नगर परिसरातील ईश्वरराव देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर 2 सत्रात हा महोत्सव होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुलेखा कुंभारे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, च्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनाचा भव्य सोहळा
सलग बारा दिवसांचे भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचेउद्घाटन 7नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता आध्यात्मिक गुरू व श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.‘चाणक्य’, ‘सम्राट पृथ्वीराज’ यासारख्या कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरांना घरोघर पोहोचवणारे लेखक व दिग्दर्शक पद्म श्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचीदेखील उपस्थिती राहील. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणायांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक ‘हमारे राम’ याची प्रस्तुती होणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये आशुतोष राणा यांनी रावणाची भूमिका साकारली आहे.
सहा लाईव्ह इन कॉन्सर्ट्स
खासदार सांस्कृतिक महोत्सवात 8 नोव्हेंबर रोजी गायक व संगीतकार विशाल मिश्रा यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे. त्यानंतर 12 तारखेला युवा गायक अखिल सचदेवा यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट, 14 तारखेला संगीतकार विशाल भारद्वाज व गायिका रेखा भारद्वाज तर 16 तारखेला श्रेया घोषाल यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होईल.
क्युआर कोड स्कॅनकरा पासेस मिळवा
कोणत्याही अडथळ्याविना या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठीक्युआरकोडद्वारे मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाहिराती, होर्डिंग्ज इत्यादी प्रसिद्धी साधनांवर असलेलाक्युआर कोड स्कॅनकेल्याबरोबरwww.khasdarmahotsav.comहे संकेतस्थळ सुरू होईल व तेथून त्या-त्या दिवसाची मोफत पास प्राप्त करता येतील. नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिकमहोत्सवआयोजन समितीचे अध्यक्षप्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव यांनी केले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी