छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या.
या बैठकीत धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर येथील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या माध्यमातून या सर्व भागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षबांधणीसाठी केलेल्या कामांची देखील यावेळी विस्तृत माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर आगामी पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जोमाने आणि एकत्रितरित्या काम करण्याच्या यावेळी सर्वांना सूचना केल्या.
यावेळी खासदार संदीपान भुमरे, शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, आमदार अर्जुन खोतकर, आमदार हेमंत पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, राम रेपाळे यांच्यासह या विभागातील सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis