नाशकात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राकपा एसपी पक्षाचे आंदोलन
नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले पॅकेज हे फसवे
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राकपा एसपी पक्षाचे आंदोलन


नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले पॅकेज हे फसवे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारस च्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने नाशिक मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार भास्कर भगरे , शहर अध्यक्ष गजानन शेलार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दादा पाटील, कोंडाजी आव्हाड, गोकुळ श पिंगळे, लक्ष्मण मंडाले, नितिन भोसले, मुन्नाभाई अन्सारी,दीपक वाघ,सुनील कोठमिरे, संजय गालफाडे अन्य पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन दिली. यावेळी

जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना घोषित केलेले पॅकेज हे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळणार नाही. पुनर्रचना करावी अशी मागणी करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विविध मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande