पैठण: भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विलास बाप्पू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला. प्रवाह परिवार
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विलास बाप्पू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.

प्रवाह परिवार अनाथ आश्रम, टाकळी (अंबड) येथील चिमुकल्यांसाठी या वर्षीची दिवाळी खास ठरली.

पैठण’ येथून चिमुकल्यांसाठी त्यांच्या आवडीनुसार नवे कपडे खरेदी केले. जेव्हा या मुलांच्या हाती नवीन कपडे पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून सर्वांचे मन गहिवरून आले.

आनंद, प्रेम आणि आपुलकीच्या या सणात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणारा हा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे. ज्यांच्या आयुष्यात थोडीशी उब हवी आहे, त्यांच्या दिवाळीत आनंदाचा उजेड फुलवण्याचे काम या उपक्रमांद्वारे वर्षानुवर्षे सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande